आत्मविश्वास कसा वाढवावा? How can grow self confidence?
म्हटलं तर सोपं आहे म्हटलं तर अवघड आहे ,पण स्वतःच्या कार्यक्षमतेवर स्वतःचाच भरवसा ठेवणे तो वाढविणे यासाठी आधी स्वतःला स्वतःच ओळखणे ,आणि आपण जे काही आहोत हे आहे तसे स्वीकारणे हे करावे लागते !! पूर्णतः वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवूनच आपले विहित कार्य करावे लागते,नशीब,मुहूर्त,शुभाशुभ हे सारे आत्मविश्वास घालविणारे घटक पूर्णपणे हद्दपार करावे लागतात म्हणजे आपण करणारे काम लहान असो व मोठे असो त्यात यश मिळते ,ते पूर्णत्वास जाते आणि यातूनच पुढे आपल्या आत्मविश्वासात वाढ होत जाते. यात स्वतःला ओळखणे हे महत्वाचे आहे. व्यक्तीच्या एकंदर जडणघडणीत आत्मविश्वास महत्वाची, प्रभावी भूमिका पार पडतो. 'व्यक्तीच्या कष्टाला जेव्हा आत्मविश्वासाची साथ लाभते तेव्हा यशाची हमी दुप्पट होते' असं म्हणतात. व्यक्तिमत्वाचा हा पैलू व्यक्तीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. ज्यामुळे चारचौघात व्यक्ती उठून दिसते. काही गोष्टी टाळून, काही सवयी बदलून आत्मविश्वास वाढवणं सोप्प आहे.
काही लोकांच्यात आत्मविश्वास मुळातच कमी असतो आणि त्यामुळे अशा लोकांना कायम दुसऱ्या माणसाच्या समर्थनाची गरज भासते. अशा माणसांनी कोणतीही गोष्ट केली तरीही जोपर्यंत त्याला दुसरी माणसे योग्य किंवा चांगले म्हणत नाहीत तोपर्यंत त्या माणसांना आपण केलेले काम हे बरोबर किंवा चांगले आहे याची खात्रीच वाटत नाही. हा मूळ स्वाभावातलाच गुणधर्म असतो.
काही माणसे अशीही असतात कि त्यांनी कोणतीही गोष्ट केली तरी ते त्यात दुर्दैवाने यशस्वी होत नाहीत. प्रत्येक वेळी त्यांचीच चूक असते असे नाही पण काही ना काही विघ्न येत जाते आणि त्यांचे कार्य अपूर्ण राहते किंवा त्यांना अपेक्षित असे यश मिळत नाही. अशा परिस्थिती त्या माणसांच्या आत्मविश्वासावर विपरीत परिणाम होऊन ते आत्मविश्वास गमावतात.
बरेच वेळा आपण एखादी मोठी योजना आखतो. या योजनेच्या पूर्ततेसाठी आपण काही घटनांना आणि काही व्यक्तींना गृहीत धरतो. परंतू ज्यावेळी गृहीत धरलेली माणसेच दगा देतात किंवा गृहीत धरलेल्या गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडत नाहीत त्यावेळी सुद्धा माणसाचा आत्मविश्वास कमी होतो.
शारीरिक अपंगत्व येणे हे सुद्धा एक आत्मविश्वास गमावण्याचे मोठे कारण आहे.
वैयक्तिक जीवनात घडलेल्या अनपेक्षित घटनांमुळेसुद्धा लोकं आत्मविश्वास गमावतात.
प्रत्येकाकडे आत्मविश्वास असतो. फक्त काही वेळा, काही घटनांमधे, परिस्थितीनुसार आत्मविश्वास डळमळीत होतो. आत्मविश्वास कमी असेल तर तो निश्चितपणे वाढविता येतो. मात्र यासाठी तुमचे प्रयत्न आवश्यक आहेत. आत्मविश्वास वाढविण्यासाठी पुढील उपाय करणे आवश्यक आहे.
१) कशीही परिस्थिती असो , चांगलाच विचार करायचा : आयुष्यात दोन्ही प्रकारच्या परिस्थिती येतात,कधी दुःखाचे,वाईट प्रसंग आले तर त्यातही चांगल काहीतरी घडलेल असतच फक्त तेवढ शोधुन काढायचं त्या प्रसंगातून बोध घ्यायचा,बाकीच विसरुन हसत खेळत पुढच्या प्रवासाला निघायच.' या तो मैं जीतता हुं,या सीखता हुं..'
२) मी कसा आहे,मला माहीत आहे :
कधी कधी आपल्या वस्तुवर किंवा वांगण्यावर टिका होते.जवळच्या माणसांचे शब्द जास्त वेदना देतात,टिकेतुन स्वतःमध्ये काय-काय सुधारणा करता येईल? फक्त एवढाच विचार करायचा बाकी विसरुन जायचं बाकी त्या विषयी जास्त चिंतन ,चिंता आणि चर्चा करण्यात वेळ घालवायच नाही फार लोड घ्यायचा नाही.सरड डिलीट मारुन मोकळ व्हायच.
३) माझा माझ्यावर विश्वास आहे:
एखांद काम नवीनच करायंच ,मला हे जमेल का नाही ? असे विचार मनात येतात तेव्हा आरशासमोर उभं राहायच आणि हो वाक्य म्हणायच ,मी प्रंचड शक्तीशाली आहे हे काम मी सहज चुटकीसरशी करु शकतो..! मी ताकदवान आहे.मी असामान्य आहे या अर्थाची तुम्हाला सुचतील ती वाक्ये स्वतःला सांगा.
४) माझा कृती करण्यावर विश्वास आहे, नुसत बोलल्याने काम होत नाही:
फक्त सुरुवात असते सळसळत्या उत्साहाने आणि निधड्या छातीने प्रत्यक्ष कामाला हात घालायचा ,यश मिळेपर्यत चिकाटीने काम करत राहायंच लवकर काम फत्ते होत.त्या कामातुन मिळालेल्या आत्मविश्वास पुढच्या कामात वापरायचा.
५)मी धैर्याने आणि नियोजनपुर्वक भीतीचा सामना करतो:
अवघड काम करताना भीती वाटतेच तीला थारा द्यायचा नाही घाबरायच नाही आणि तीला मनात जास्त रेगांळु द्यायच नाही हसत-हसत तिचा सामना करायचा.
६) मी माझ्या उणीव शोधतो,आणि त्या दुर करतो:
कालच्यापेक्षा आज स्वतःमध्ये मी काय सुधारणा केली : असा प्रश्न रोज स्वतःला विचारायचा तुमची स्पर्धा इतराशी नाही तुमच्या स्वतःशी आहे.म्हणजे आपण कालच्या पेक्षा आज आणि आजच्या पेक्षा उद्या जास्त यशस्वी होत राहु.
७) यशस्वी लोकांसारखी ' बॉडी लँग्वेज्' वापरण्याचा सराव करावा :
प्रत्येक यशस्वी माणसांमध्ये हसरा,प्रसन्न चेहरा,रुबाबात ताठ चालण वाँर्म हँडशेक बोलताना हातांची अर्थपुर्ण हालचाल समोरच्याच्या डोळ्यांमध्ये बघत बोलण,स्पष्ट खणखणीत आवाज नर्मविनोदी ह्या सगळ्या गोष्टी असतात,त्यांच्या देहबोलीचा अभ्यास करत त्यांच्याकडुन सतत शिकत स्वतःच डँरीगं व्यक्तीमत्व बनवायच.
८) कार्य कुशलता:
तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रात असलेली कौशल्य तुम्हाला प्राप्त करावी लागतात.
ती कौशल्य प्राप्त करत असताना त्यातील बारकावे तुम्हाला तपासून पाहावे लागतात आणि त्यात पारंगत होण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागते. उदाहरणार्थ तुम्हाला कार चालवण्यासाठी ची क्षमता प्राप्त करायची असेल तर तुम्हाला त्यातील बारकावे लक्षात घ्यावे लागते याच्या गोष्टी शिकणे महत्त्वाचे आहे. ते तुम्हाला आत्मसात करावे लागेल आणि हळूहळू तुम्हाला आत्मविश्वास हा मुळांमध्ये सरावाशिवाय प्राप्त होत नाही.
म्हणून तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रातील तुमचे काम सर्वांगानी अधिक उत्तम झाले पाहिजे. तर तुम्हाला आत्मविश्वास प्राप्त होतो.
९) संवाद कौशल्य:-
आत्मविश्वास हा बऱ्याचदा किंबहुना नेहमीच संवादातूनही उमटत असतो. त्यामुळे प्रभावी बोलणे गरजेचं असते. त्यासाठी चांगले विचार, माहिती असणं अधिक महत्वाचं. आणि त्यामुळेच दर्जेदार वाचन गरजेचं. शिवाय वाचनाने माणूस समृद्ध होतच असतो ते वाया जात नाही. त्यामुळे नेहमी काही न् काही वाचन करत राहावं